नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
 
रजिस्टर्ड कार्यालय :
 

ॲग्रीसन हाऊस, आर्वी छोटी - ४४२३०७

ता. हिंगणघाट जि. वर्धा
Mob : 9730582004, 9730786004
=-=-=-=
सभासद व्हा, भागधारक व्हा 
 
  • १८ वर्षावरील कुणीही भारतीय व्यक्ती कंपनीचा भागधारक होऊ शकेल.
  • महिलांना प्राधान्य 
 
शेअर मूल्य :

पुरुषांसाठी शेअर मूल्य :

१) शेअर मूल्य - १०००/-
२) प्रवेश फी - ३००/-
३) स्मारक/ग्रंथालय निधी - ३००/-
 
प्रती शेअर एकूण रक्कम रु. १६००/- किंवा त्यापटीत शुल्क भरून कंपनीचे सभासद-भागधारक होता येईल.

 

महिलांसाठी शेअर मूल्य :
 
१) शेअर मूल्य - १०००/-
२) प्रवेश फी - १००/-
३) स्मारक/ग्रंथालय निधी - ३००/-
 
प्रती शेअर एकूण रक्कम रु. १४००/- किंवा त्यापटीत शुल्क भरून महिलांना कंपनीचे सभासद-भागधारक होता येईल.
=-=-=-=
शेअर शुल्काची रक्कम खालील खात्यावर जमा करावी
=-=-=
आमचे मार्गदर्शक
मा. सरोजताई काशीकर
मा. अ‍ॅड. वामनराव चटप
 
====
युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
संस्थापक संचालक मंडळ
 
१ श्री. गंगाधर महादेवराव मुटे
२ सौ. शैलजा लक्ष्मीकांत देशपांडे 
३ श्री. रमेश जिजाभाऊ खांडेभराड
४ श्री. दिलीप लक्ष्मणराव भोयर 
५ सौ. उषा सारंग दरणे
६ सौ. वंदना वामनराव चटप
७ श्री. जयंत रामचंद्र बापट
८  श्री. गणेश दिनकरराव पाटील
९  श्री. सुभाष धनुजी बोकडे
१०  श्री. रविंद्र जगन्नाथजी खोडे
११  सौ. मनोरमा गणेश मुटे
=-=-=-=
युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.
सभासद (शेअरहोल्डर) व्हा.
नोंदणी करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२२

नमस्कार,

युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. या उपक्रमाचे ३ विभागात वर्गीकरण असेल.
 
१) स्मृतींचे जतन - युगात्मा शरद जोशींच्या स्मृतींची जपणूक, स्मृती समारंभ, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, चिंतन-मनन सुविधा व विचारप्रसारासाठी युगात्मा स्मारक 
२) साहित्य प्रसार - युगात्मा शरद जोशींच्या साहित्याच्या प्रसारासाठी युगात्मा ग्लोबल ग्रंथालय. ग्लोबल ग्रंथालयाची व्याप्ती मोठी असेल जेथे शेतीविषयातील सर्व साहित्याचा संग्रह असेल. सोबतच Online ग्लोबल डिजिटल ग्रंथालय ही कल्पना सुद्धा आपल्याला साकार करायची आहे. शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.
३) युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी - सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती व निर्यात शेतीची शरद जोशींची संकल्पना साकार करण्यासाठी 
 
पहिले वर्ष - पहिला टप्पा :
पहिल्या टप्प्यात पहिल्यावर्षी आपल्याला युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ''सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती, निर्यात शेती..... म्हणजेच युगात्मा शरद जोशींच्या स्वप्नातील भारत''
 
बदलत्या काळाच्या प्रवाहाचा वेध घेत १९९२ मध्ये द्रष्टे शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना मांडून शेतकऱ्यांनी यापुढे सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती अशी चतुरस्त्र शेती करावी, असे आवाहन केले होते. सोबतच काही प्रात्यक्षिके म्हणून त्या दिशेने पाऊलही टाकले होते पण त्यावेळेस शासकीय धोरणे शेती प्रक्रिया व्यवसायाला पूर्णतः प्रतिकूल असल्याने ही दार्शनिक प्रात्यक्षिके आदर्श मॉडेलमध्ये रूपांतरित होऊ शकली नव्हती. त्यासोबतच रस्त्यावरची लढाई निकराने लढण्यातच पुरेशी दमछाक झाल्याने संघटनेच्या पाईकांना आर्थिक लढाई लढायला उसंतच मिळाली नाही.
        १९९२ मध्ये शरद जोशींच्या गुरुकिल्लीकडे कानाडोळा करणाऱ्या शासनाने कालांतराने मात्र हीच संकल्पना शरद जोशींचे नाव न घेता आडपडद्याने स्वीकारली. शेतमाल प्रक्रियेला प्रतिकूल असलेली पूर्वीची धोरणे हळूहळू अनुकूल व्हायला लागली. शेतकरी उत्पादक कंपन्यांना मदत करण्यासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती झाली आणि आता तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना भरघोस अनुदान देणाऱ्या विविध योजना अस्तित्वात आल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्थपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी एकजूट करून शेतमाल मूल्यसाखळी विकसित करण्याची, प्रक्रिया उद्योग उभारण्याची, शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा पाया रचण्याची हीच योग्य वेळ आहे.
 
युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी Companies Act, 2013 नुसार रजिस्टर झाली असून ३१ जानेवारी २०२२ रोजी नोंदणी, पॅन व टॅन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
कंपनीची सभासद (शेअरहोल्डर) नोंदणी सुरु असून नोंदणी करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२२ आहे. 
 
आपण सभासद (शेअरहोल्डर) होऊ इच्छित असाल तर आपणास खालील बाबींची पूर्तता करावी लागेल.
 
१) २५ मार्च २०२२ पूर्वी आपला सभासद अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत आधार, पॅन, फोटो व सातबारा, ८ अ. जोडावा लागेल. शेतकरी नसल्यास भूमिहीन असा उल्लेख अर्जात करावा.
२) २५ मार्च २०२२ पूर्वी शेअरची रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा करावी लागेल.
३) १८ वर्षावरील व्यक्ती सभासद होऊ शकतो.
४) एका कुटुंबातील कितीही सदस्य सभासद होऊ शकतात.
 
सभासदत्व मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज :
 
१) https://sharadjoshi.in/sites/default/files/Yugatma-sjfpcl-Share-Appl-For... या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा. पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून कंपनीच्या पत्यावर पोस्टाने पाठवावा. (कुरिअरने पाठवू नये.) तसेच व्यवस्थित स्कॅनिंग करून एक प्रत yugatma@gmail.com वर किंवा व्हाटसपवर पाठवावी.
२) वर बँक डिटेल्स दिलेले आहेत. शुल्काची रक्कम प्रत्यक्ष बँकेत जाऊन रोखीने किंवा NEFT/RTGS/Phone Pay/ Gpay च्या माध्यमातून भरावी व पैसे भरल्याची पावती अर्जासोबत जोडावी.
 
महत्वाची सूचना : ३१ मार्च २०२२ रोजी वित्तीय वर्ष संपत असल्याने फॉर्मसोबत शुल्काच्या रकमेचा चेक पाठवू नये कारण ३१ मार्चच्या आत चेक खात्यावर जमा होईलच याची खातर नाही. त्याऐवजी आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन कंपनीच्या खात्यावर जमा केला तर चालेल. त्यापेक्षा online रक्कम जमा करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
 
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
 
आपला स्नेहांकित 
- गंगाधर मुटे  
====
 
-------

लेखनप्रकार: 
स्मारक
Image: