नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



मा. शरद जोशी यांचा जीवनपट

Sharad Joshi
 

मा. शरद जोशी यांचा जीवनपट

जन्म : ३ सप्टेंबर १९३५
मृत्यू : १२ डिसेंबर २०१५
जन्मस्थान : सातारा
वडील : स्व. अनंत नारायण जोशी
आई : स्व. इंदिरा अनंत जोशी
पत्नी : लीला (१९४३ - १९८२)
कन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा) डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
शिक्षण    
प्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी : 1951
बि.कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
एम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक : बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक
IPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार : राज्यसभेचे सदस्य
व्यवसाय    
1 : कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
2 : भारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८ पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत
प्रवर्तक सहभाग.
3 : Chief, Informatics Servise, International Bureau, UPU (Universal Postal Union),
Bern, Switzerland 1968-1977
4 : शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत
संघटना कार्य    
1 : मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे
2 : शेतकरी संघटनेची स्थापना : १९७९ ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
3 : १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस,
इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे,
प्रशिक्षण शिबिरे,अधिवेशने
4 : देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना : ३१ ऑक्टोंबर १९८२
5 : महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ,
तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने
स्त्री प्रश्नांची मांडणी    
1 : चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. 
अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
2 : स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
3 : शेतकरी महिला आघाडीची स्थापना
4 : महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
5 : महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी
6 : ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरूषांना आवाहन (१९८९).
प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नोंदविली गेली.
7 : दारूदुकानबंदी आंदोलन
8 : पंचायत राज्य बळकाव आंदोलन
संस्थात्मक कार्य    
1 : संस्थापक अध्यक्ष
2 : कृषि-योगक्षेम संशोधन न्यास 
3 : चाकण शिक्षण मंडळ
4 : शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि. 
5 : भामा कन्स्ट्रक्शन्स लि.
राजकीय कार्य    
1 : स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
2 : देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता मांडणारा व
त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना,
मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा
3 : स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१०
4 : विशेष पदनियुक्ती
5 : अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१) कॅबिनेट दर्जा.
"राष्ट्रीय कृषिनीती " चा मसुदा
6 : राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
7 : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य१९९७
8 : अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१). कॅबिनेट दर्जा.
जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती, विशेषत: कृषिनीती कशी असावी याची
शिफ़ारस करणारा अहवाल
9 : २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य
10 : जागतिक स्तर
11 : जागतिक कृषिमंच (World Agriculture forum)  सेंट लुई (अमेरिका) च्या सल्लागार मंडळाचे
सदस्य १९९९ पासून.
12 : अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी  नियमित निमंत्रित.
13 : लिखान/संपादन
14 : शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
15 : ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती, कन्नड व तेलगू भाषांतरे,
16 : द टाईम्स ऑफ़ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदु बिझिनेस लाइन, लोकमत ईत्यादी
नियतकालिकांमध्ये, दैनिकांमध्ये स्तंभलेखन,
17 : शेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्ष व ’आठवड्याच्या ग्यानबा’
या साप्ताहिकासाठी २ वर्ष नियमित लेखन
पुरस्कार    
1 : सातारा भूषण: रा.ना.गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फ़े ११ वा सातारा भूषण पुरस्कार २०१०
2 : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१०: ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी
3 : Agriculture Today या मासिकातर्फ़े दिला जाणारा पहिला Agriculture Leadership Award 2008
4 : चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई ’जीवनगौरव पुरस्कार २०११’
5 : ज्ञानश्री पुरस्कार, आंबेजोगाई २३ डिसेंबर २०१२
6 : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार २५ नोव्हेंबर २०१४
7 : मारवाडी फाऊंडेशन नागपूरचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २० नोव्हेंबर २०१४
संशोधन
मार्गदर्शन
: तिसर्‍या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून
शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी,
अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.
ठळक नोंदी
'इंडिया-भारत’
: १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामंतर देशाच्या सरकारने शेतकर्‍यांच्या शोषणाची इंग्रज
सरकारची वसाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने
सामाजिक, सांकृतिक व मानसिक व्दैत तयार झाले हे व्दैत अधोरेखित करणार्‍या  ’इंडिया-भारत’
संकल्पनेचे उद्गाते विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकर्‍यांना भरघोस अनुदाने दिली जातात.
भारतात मात्र शेतकर्‍यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.
शरद जोशी
यांची ग्रंथसंपदा
   
1 : शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
2 : प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश 
3 : चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
4 : शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
5 : स्वातंत्र्य का नासले?
6 : खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
7 : अंगारमळा
8 : जग बदलणारी पुस्तके
9 : अन्वयार्थ - १,२
10 : माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
11 : बळीचे राज्य येणार आहे
12 : अर्थ तो सांगतो पुन्हा
13 : पोशिंद्याची लोकशाही
14 : भारतासाठी
15 : राष्ट्रीय कृषिनीती
इंग्रजी ग्रंथसंपदा    
1 : Answering before God
2 : The Women's Question
3 : Bharat Eye view
4 : Bharat Speaks Out
5 : Down To Earth
हिंदी ग्रंथसंपदा
   
1 : समस्याए भारत की
2 : स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?