युगात्मा शरद जोशी स्मारक
युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. या उपक्रमाचे ३ विभागात वर्गीकरण असेल.
१) स्मृतींचे जतन - युगात्मा शरद जोशींच्या स्मृतींची जपणूक, स्मृती समारंभ, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, चिंतन-मनन सुविधा व विचारप्रसारासाठी युगात्मा स्मारक
२) साहित्य प्रसार - युगात्मा शरद जोशींच्या साहित्याच्या प्रसारासाठी युगात्मा ग्लोबल ग्रंथालय. ग्लोबल ग्रंथालयाची व्याप्ती मोठी असेल जेथे शेतीविषयातील सर्व साहित्याचा संग्रह असेल. सोबतच Online ग्लोबल डिजिटल ग्रंथालय ही कल्पना सुद्धा आपल्याला साकार करायची आहे. शेती विषयातील सर्व ग्रंथ, प्रबंध, शोधप्रबंध, पुस्तके, विशेषांक, कादंबरी, काव्यसंग्रह यासहित सर्व शेती साहित्य एकत्रितपणे वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असणार आहे.
३) युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी - सीता शेती, माजघर शेती, व्यापार शेती व निर्यात शेतीची शरद जोशींची संकल्पना साकार करण्यासाठी