नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.महिला आघाडीची प्रतिज्ञा

 
महिला आघाडीची प्रतिज्ञा 
 
* * *
 
आम्ही प्रतिज्ञा घेतो की
आम्ही यापुढे स्त्रियांना कधीही कनिष्ठ मानणार नाही
विशेषतः गर्भ स्त्री-बालकाचा आहे यास्तव त्याला
जन्माचा हक्क नाकारणार नाही
मुलगी आहे म्हणून लालनपालन, वात्सल्य, शुश्रूषा
आणि शिक्षण यात कमी करणार नाही
स्त्रियांना मालमत्तेमधील त्यांची वाटणी, गूण वाव 
आणि स्वातंत्र्य मिळण्याआड येणार नाही
तसेच मुलींचे शिक्षण आणि बालविवाह याच्याबद्दलच्या
कायद्यांचे पूर्णपणे परिपालन करू. 
सासुरवाशिणींना घरच्या लेकींप्रमाणे वागवू आणि 
माहेरवाशिणींना आमचा आधार कायम वाटेल अशा वागवू
विधवा, घटस्फोटितपरित्यक्ता आणि विशेषतः अत्याचारांना
बळी पडलेल्या स्त्रियांना कमी लेखणार नाही
स्त्रियांचे शृंगार-ललित रूपच प्रकाशात आणून
त्यांची नटवी, उपभोग वस्तूची हिडीस प्रतिमा
मांडणार नाही आणि मांडू देणार नाही.
 
* * *