admin यांनी गुरू, 03/09/2020 - 22:11 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
समारंभ वृत्तांत
प्रकार:
वृत्तांत
युगात्मा शरद जोशी यांची ८५ वी जयंती दिनांक ०३ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रसह अनेक राज्यात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी सर्वत्र कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोबतच फेसबुक, व्हाटसप व अन्य सोशल माध्यमांचा वापर करून युगात्मा शरद जोशींना अभिवादन करण्यात आले.
admin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
आंदोलन
आगामी कार्यक्रम
शेतकरी संघटना
शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन
दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७
स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४
शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.
गंगाधर मुटे यांनी मंगळ, 08/09/2015 - 23:10 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
शेतकरी संघटना
शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५
कोटीकोटी शेतकर्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत.