admin यांनी गुरू, 03/09/2020 - 22:11 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
समारंभ वृत्तांत
प्रकार:
वृत्तांत
युगात्मा शरद जोशी यांची ८५ वी जयंती दिनांक ०३ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रसह अनेक राज्यात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम आयोजित करता आले नसले तरी सर्वत्र कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोबतच फेसबुक, व्हाटसप व अन्य सोशल माध्यमांचा वापर करून युगात्मा शरद जोशींना अभिवादन करण्यात आले.