नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक

युगात्मा शरद जोशी यांचे प्रस्तावित अर्थपूर्ण स्मारक

          श्री शरद जोशी (1935-2015) हे भारतीय शेतकरी चळवळीचे एक अभ्यासू आणि खंबीर नेते होते. इंडिया-भारत ही त्यांची द्वैत-मांडणी मान्यताप्राप्त झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महत्वाच्या पदावरून स्वेच्छापूर्वक मुक्त होऊन ग्रामीण भारत व शेतकरी समाजाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी चाकणजवळ आंबेठाण येथे त्यांनी कोरडवाहू शेती विकत घेतली. शरद जोशी सुरुवातीस शेतीमालाला रास्तभाव या एककलमी मागणीवर ठाम होते, कारण स्वातंत्र्यानंतर नेहरू-इंदिरा गांधी, जनता पक्ष आदि व्यवस्थेत १९९१ पर्यंत समाजवाद व नियोजित अर्थव्यवस्था होती. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण या व्यवस्थेची जणू गरज होती. या अत्यंत प्रतिकूल वातावरणात १९७९ पासून महाराष्ट्रात आणि देशात एक प्रचंड अर्थवादी आंदोलन त्यांनी उभे केले.

          तथापि शरद जोशी हे सदैव खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक होते. डंकेल प्रस्ताव व जागतिक व्यापार कराराचे त्यांनी भारतात सर्वप्रथम स्वागत केले. मात्र १९९२ नंतरही आजतागायत शेतीक्षेत्रासाठी खुली व्यवस्था नाही. भारत आणि इंडिया या दोन्हीसाठी खुली अर्थव्यवस्थाच आवश्यक आहे हे त्यांचे प्रतिपादन आज मान्यता पावत आहे. शेतकरी संघटना आणि लिबरल चळवळीत त्यांचे अनेक अनुयायी आहेत. मा. बाजपेयी पंतप्रधान असताना शरद जोशी शेती-विषयक कार्यबलाचे अध्यक्ष व नंतर राज्यसभेचे खासदार होते. शरद जोशींची मराठी-इंग्रजीमधील अनेक भाषणे, लेख, पुस्तके, मुलाखती, अहवाल उपलब्ध आहेत. स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांची सम्यक अर्थराजकीय भूमिका आहे. प्रदीर्घ आजारपणानंतर 12 डिसेंबर 2015 ला शरद जोशी यांच्या निधन पावले आणि त्याबरोबर शेतकरी व लिबरल आंदोलनाचे एक पर्व समाप्त झाले आहे. 

          शरद जोशी यांनी हयात असतानाच शेतकरी संघटना ट्रस्ट स्थापून स्वत:ची शेतजमीन, एक घर व पुस्तके आणि काही वस्तू सुपूर्त केल्या आहेत. या जागी त्यांचे एक अर्थपूर्ण स्मारक करावे असा आमचा प्रकल्प आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात ६००० चौरस फुटांचे एक निवासी अभ्यासकेंद्र बांधायचे आहे. त्यांचे घर तसेच जतन केले जाणार आहे. या अभ्यासकेंद्राची ढोबळ कल्पना सोबत मांडली आहे. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आहे. 

आर्थिक देणगीसाठी तपशील: 
शेतकरी संघटना, विजया बॅंक,
बचत खाते क्र 503801011003483 (IFSC VIJB0005038).
80G सवलत सध्या उपलब्ध नाही
02 नोव्हेंबर 2016

शरद जोशी लिबरल अकादमी
प्रथम टप्प्यासाठी ढोबळ तपशील
पुण्यापासून अंतर ३५ किमी
चाकण पासून अंतर ७ किमी
एकूण उपलब्ध क्षेत्र ६ एकर
पहिल्या टप्प्यासाठी १ एकर, सध्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे एक कोटी रुपये
उपलब्ध वास्तू स्व शरद जोशी यांचे राहते घर, ग्रंथागार, जुना प्रशिक्षण-निवारा
नियोजित बांधकाम-पहिला टप्पा ६००० चौफुट, दुमजली, २०+ निवासी व्यवस्था, प्रशिक्षण दालन इ
वस्तू-विशारद नेमण्याची प्रक्रिया चालू आहे

नियोजित कार्यक्रम 
• कार्यकर्त्यांसाठी मासिक/द्वैमासिक प्रशिक्षण कार्यक्रम
• श्रेयांकित वार्षिक अभ्यासक्रम
• संशोधन व अभ्यासवृत्ती
• वेबिनार
• अहवाल, पुस्तिका प्रकाशन आदि

प्रथम टप्प्यासाठी लागणारा निधी ५० लाख अंदाजित
ट्रस्टकडे उपलब्ध निधी १० लाख, आणि ५ लाख अपेक्षित
उर्वरित आवश्यक निधी ३५ लाख
इतर गरजा संगणक LCD, दूर-संपर्क कॉन्फरन्स व्यवस्था
फर्निचर आदि ५ लाख
वाहन भाडे तत्वावर लागेल तसे
व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे
अभ्यास - संशोधन शिष्यवृत्ती वार्षिक २-५ , यासाठी प्रायोजक लागतील
प्रशिक्षक विषय-तज्ज्ञ, निमंत्रण तत्वाने

Website सध्या सुरु झाली आहे, bharatliberals.org

बांधकाम प्रारंभ व कालावधी जानेवारी २०१७ , अंदाजे ६ महिने .
अपेक्षित सहकारी संस्था Center for Civil Society, Liberty Institute Delhi, Indian Liberal Group

संपर्कासाठी : अनंत देशपांडे (9403541841)
गोविंद जोशी (9422175461)
डॉ शाम अष्टेकर (9422271544, ashtekar.shyam@gmail.com)
संजय पानसे (trustee 9821087277)
सुमंत जोशी 9370010424)